logo

गुरुवारी तसेच शुक्रवारी मुंबईत पाणीबाणी; धारावी, वांद्रे परिसरातील काही भागात १००% पाणीकपात

मुंबई, दि. १५ : प्रतिनिधी
जी/उत्तर विभागातील धारावी नवरंग कंपाऊंड जलवाहिनी जलजोडणीच्या कामास्तव गुरुवार, दि. १८ एप्रिल व शुक्रवार, दि. १९ एप्रिल रोजी काही भागांत १०० टक्के तर काही भागांत २५ टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागातील धारावी नवरंग कंपाऊंड येथे २४०० मिली मीटर व्यासाची अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिनी व ४५० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी यांच्या जलजोडणीचे काम दि. १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपासून दि. १९ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत (एकूण १८ तासांसाठी) हाती घेण्यात आले आहे. या कालावधीत काही भागांत १०० टक्के तर काही भागांत २५ टक्के पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

- १०० टक्के पाणीपुरवठा बंद असलेला भाग
१. एच पूर्व विभाग : वांद्रे रेल्वे टर्मिनस व वांद्रे स्थानक परिसर (दि. १८ एप्रिल व दि. १९ एप्रिल)
२. जी-उत्तर : धारावी लूप मार्ग, नाईक नगर, प्रेम नगर (दि. १८ एप्रिल रोजी धारावी येथील सकाळचा पाणीपुरवठा)
३. जी-उत्तर : धारावी लूप मार्ग, गणेश मंदीर मार्ग, दिलीप कदम मार्ग, माहीम फाटक मार्ग (दि. १८ एप्रिल रोजी धारावी येथील सायंकाळचा पाणीपुरवठा)

- २५ टक्के पाणीपुरवठा बंद असलेला भाग
१. जी-उत्तर : ६० फूट रोड, शीव-माहीम लिंक रोड, ९० फुट रोड, महात्मा गांधी मार्ग, संत कक्कया मार्ग, ए. के. जी. नगर, एम. पी. नगर (दि. १८ एप्रिल रोजी धारावी येथील सकाळचा पाणीपुरवठा)

34
1534 views